रोशनचा मृतदेह सापडला! हिवरा आश्रम जवळच्या विवेकानंद स्मारक असलेल्या कोराडी प्रकल्पात काल मारली होती उडी! कालपासून सुरू होता सोध

 
thdh
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,२३ जूनला हिवरा आश्रम जवळील विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद स्मारक असलेल्या कोराडी प्रकल्पात भानखेड येथील रोशन इंगळे या तरुणाने उडी मारली होती. आज,२३ जूनला दुपारी बाराच्या सुमारास रोशनचा मृतदेह हाती लागला. काल दुपारपासून रोशनचा शोध सुरू होता, रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते.
 

रोशन मुराजी इंगळे(२२) हा तरुण काल त्याच्या मित्रांसोबत हिवरा आश्रम येथे पर्यटनासाठी गेला होता. विवेकानंद स्मारक असलेल्या कोराडी  प्रकल्पात बोटीवरून फिरताना त्याने व त्याच्या मित्राने उडी मारली होती. त्याच्या मित्राला वाचवण्यात नावाडी गुलाब इंगळे यांना यश आले होते मात्र रोशन पाण्यात बुडाला होता. काल दुपारपासून त्याचा शोध सुरू होता, रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर येईल असे सर्वांना वाटत होते मात्र तसे झाले नाही. आज सकाळी बुलडाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संभाजी पवार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. 
सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान गळ लावून शोध सुरू असताना रोशनचा मृतदेह गळाला अडकून बाहेर आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे पाठविण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागातील तारासिंग पवार, गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, इशाड पटेल, समाधान देशमाने , समाधान साबळे, कृष्णा जाधव,वैभव जाधव व तलाठी रहाटे यांनी शोधकार्य राबवले.