बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल! चिमुकलीला घरात ओढले, हात पाय बांधले, तोंडाला बांधला रुमाल अन पलगांवर टाकून पाप केलं..!
४२ वर्षाच्या नराधमाला चिमुकलीवर अत्याचार करतांना लाज नाही वाटली! खामगावची धक्कादायक घटना...
Updated: Oct 28, 2023, 16:26 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका ११ वर्षीय चिमुकलीवर ४२ वर्षाच्या नराधमाची पापी नजर पडली. वासनांध नराधमाने मुलीचे हात पाय तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला. खामगावच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे.
पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणाची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. कैलास निमकर्डे असे आरोपीचे नाव असून तो ४२ वर्ष वयाचा आहे. घटना काल,२७ ऑक्टोबरच्या दुपारची आहे. यावेळी पीडित ११ वर्षीय मुलीची आई बाहेर गेली असल्याने मुलगी आत्याच्या घरी होती.
दरम्यान पीडित मुलगी संडासवरून परत येत असताना नराधम कैलास निमकर्डे याने मुलीचा हात धरून तिला घरात ओढले. घराचा दरवाजा आतून बंद केला. पिडीत चिमुकलीचे दोन्ही हात , पाय व तोंड रुमालाने बांधून कैलास निमकर्डे याने मुलीला पलंगावर टाकले आणि मुलीवर बलात्कार केला. घडलेली घटना कुणाला सांगू नको अशी धमकीही त्याने दिली..
घटनेनंतर पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. पिडीत मुलीची आई कामावरून परत आल्यानंतर आईने मुलीची विचारपूस केली. यावेळी पोट आणि लघवीच्या जागेवर दुखत असल्याचे सांगत घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने मुलीसह शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी कैलास निमकर्डे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.