रस्त्यात गाडी लावली म्हणून बुलढाण्याच्या रावणाने एकास मारले..!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गाडी रस्त्यात लावल्याचा शुल्लक कारणावरून वाद घालत मंडप डेकोरेशनच्या गाडी चालकाला मारहाण केल्याची घटना येथील चिखली रोडवरील पेट्रोलपंपा नजीक घडली. प्रकरणी रावण उर्फ राज मंजुळकर याच्यासह तीन ते चार अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
याबाबत दत्तात्रय कैलास वाघ (२५ वर्ष) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली की, रविवारी दि. १९ मेच्या सायंकाळी गायरान परिसरात मंडप डेकोरेशनचे साहित्य घेऊन जात असताना, तीन ते चार जणांनी गाडी रस्त्यात लावल्याच्या कारणावरून वाद घातला. दरम्यान, २० मे रोजी केळवद येथे जाण्यासाठी फिर्यादी कैलास वाघ निघाले असता पेट्रोलपंपा जवळ गायरान येथे वाद घालणारी मंडळी दिसली. त्यांनी जवळ येवून पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. वाघ यांच्या दुचाकीला लाथ मारून ढकलून दिले. त्यांनतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, शिवीगाळ केली. यात कैलास वाघ यांना डोक्यावर, डोळ्यावर पाठीवर मार लागल्याने दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, रावण उर्फ राज मंजुळकर याच्यासह अन्य तीन ते चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.