रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर छापा! रायपूर पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) रायपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध गावात दारूची अवैध विक्री करणाऱ्या चौघांवर आज शनिवार, १६ मार्च रोजी पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण १३ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दुपारी साखळी, शिरपूर, रायपूर सैलानी येथे अचानक धाड टाकली. त्यामध्ये शिरपूर येथील एका महिलेकडे २४५० रुपयांची संत्रा दारू मिळून आली. तर सैल्लानी येथे दत्ता गायके याच्याकडे २२८० रुपयांचा विदेशी दारूचा माल मिळाला. रायपूर येथून कैलास झगरे याच्याकडून ८४० रुपयांचा माल प्राप्त झाला. तसेच पांगरीच्या सचिन इंगळे कडून याच्याकडे सर्वाधिक ७ हजार ७१५ रुपयांची देशी व देशी दारू मिळून आली. असा एकूण १३ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. वरील चारही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे एपिआय दुर्गेश राजपूत, व उत्पादन शुल्क विभागाचे श्री माकोडे यांच्या नेतृत्वात पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.