शेताच्या नांगरणीवरून रिधोऱ्यात राडा राडा! लोखंडी रॉडने कुटा-कुटी; ७ जणांवर गुन्हे दाखल

 
fg

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रिधोरा शिवारात शेती नांगरणी करीत असताना शाब्दीक बाचाबाची होऊन दोन गटांत राडा झाला. यामध्ये परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील ७ जणांवर विविध कलमान्वये बोराखेडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. २७ मे रोजी ही घटना घडली.

दिगांबर चांगो मानकर यांनी यांच्या पुतणीच्या मालकीची वहिती करत असलेली शेती नांगरणी करीत असताना फिर्यादी व त्यांचा मुलगा व भाऊ यांनी सुनील चंद्रभान घाटे, पवन सुनिल घाटे व विजय धांडे तिन्ही रा. मोताळा व निंबाजी गायकवाड रा. पिं.पाटी यांना आमची शेती का नांगरत आहात असे विचारल्याने उपरोक्त आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मुलगा व भाऊ यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशा फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी सुनिल घाटे, पवन घाटे, विजय धांडे व निंबाजी गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

तर निंबाजी भिमराव गायकवाड यांनी बोराखेडी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे साक्षीदार यांचे रिधोरा जहागीर शिवार गट नंबर ७६ मधील शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत असताना डिगांबर चांगो मानकर, विकास डिगांबर मानकर व कमलाकर मानकर सर्व रा. रिधोरा हे निंबाजी गायकवाड यांच्याजवळ आले व तुम्ही आमच्या शेतात नांगरटी का करीत आहे, शेतातून निघून जा, असे म्हणून गायकवाड यांना जातीवाचक शिविगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी डिगांबर मानकर, विकास मानकर व कमलाकर मानकर यांच्यावर बोराखेडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास उपविभागीय पलिस अधिकारी गुलाबराव वाघ करीत आहेत.