दहावीतल्या २ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धर्मेंद्र हिवाळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला! धर्मेंद्र कोणत्या बिळात लपलाय? आता धर्मेंद्र समोर "हे" दोन पर्याय..

जाहिरात👆
दोन्ही पीडित भाऊ जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील एका गावातले आहेत. दहावीसाठी त्यांनी बुलडाणा तालुक्यातील एका नामवंत निवासी विद्यालयात प्रवेश घेतला होता. त्या शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या धर्मेंद्र हिवाळे या विकृत मनोवृत्तीच्या मास्तरने दोन्ही भावांवर विज्ञानाच्या प्रयोगशाळेतच लैंगिक अत्याचार केले होते. प्रॅक्टिकल चे गुण देणार नाही अशी धमकी देत तो दोन्ही भावांचे लैंगिक शोषण करीत होता. मास्तरच्या धाकाने दोन्ही भाऊ एकदा शाळेच्या टॉयलेट मध्ये देखील लपले होते.
मात्र तरीही विकृत मास्तरच्या तावडीतून ते सुटू शकले नव्हते. अखेर मास्तरचा त्रास वाढल्याने मुलांनी कुटुंबीयांना व शाळा व्यवस्थापनाला याबद्दल सांगितले, त्यानंतर बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी धर्मेंद्र हिवाळे विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच धर्मेंद्र हिवाळे फरार झाला. जिल्हा व सत्र न्यायालयात त्याने वकिलांकरवी जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र न्यायालयाने काल,८ मार्च रोजी जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे एकतर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणे किंवा पोलिसांसमोर शरणागती पत्करणे असे दोन पर्याय हिवाळे समोर आहेत.