बुलढाण्यातील आठवडी बाजारात तलवार मिरवणाऱ्या जावेदला पोलिसांनी घेतले ताब्यात!

 
Buldana

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील आठवडी बाजार परिसरात एक जण तलवार बाळगून असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यावरून काल १६ मार्च, शनिवारच्या रात्री बुलढाणा पोलिसांनी छापा टाकला. तर इक्बाल नगरातील रहिवासी जावेद खान (३३ वर्ष) हा तलवार बाळगत असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. त्याच्याजवळील वक्रकार आकाराची तलवार जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्राप्त गुप्त माहिती आधारे घटनास्थळी जावुन पोलिसांनी खात्री केली असता जावेद खान नावाचा युवक सार्वजनिक ठिकाणी बेकायदा दोन टोके असलेली वक्रकार पात्याची तलवार एकुण 68 से.मी. लांबीची (किंमत अंदाजे २०००) बाळगुन असतांना मिळुन आला. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेली अधिसुचना व आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी जावेद खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी पो.स्टे. बुलढाणा शहर हे करत आहेत.