रात्रीस खेळ चाले... ९ जणांना चुकीचे काम करताना पकडले!

देऊळघाटमध्ये कारवाई
 
 
जुगार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळघाट (ता. बुलडाणा) येथील जुनाट किल्ल्याच्या बाजूला विद्युत खांबाच्या प्रकाशाखाली जुगार खेळणाऱ्या ९ जणांना बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी पकडले. ही कारवाई १९ नोव्हेंबरला मध्यरात्री करण्यात आली आहे.
गोपनीय माहिती मिळाल्यावरून ठाणेदार गिरीश ताथोड यांनी पथक देऊळघाटकडे पाठविले. जुगार खेळणारे शेख वसीम शेख करीम (३४), नसिरउद्दीन समसुद्दिन (३९), प्रकाश किटे (२०), संजय वानरे (३६), सय्यद नाशिर सय्यद रशीद (३२), दयाराम जाधव (४२), विजय पन्हाळे (३५), मंजूरखा अत्तरखा (६०, सर्व रा. देऊळघाट) यांना ताब्यात घेण्यात आले. हाजीक खैरू नावाचा संशयित फरारी झाला. ९ आरोपींविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांच्‍याकडून २५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक गजानन शिंदे, पोहेकाँ गणेश शेळके, पोहेकाँ दिलीप बोरसे, पोकाँ दुर्गासिंग ठाकूर, मपोकाँ पूजा साळवे यांनी केली आहे.