उचलली जीभ लावली टाळ्याला ! पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांविषयी चुकीचे बोलला, पण तरुणाची पोलिसांसमोर बोलती बंद झाली! खामगावची घटना..

 
Kham
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कारण आहे अनेक चांगले जीवन जगण्याचे, पण बोलताना भान हवे विधानाचे असा एक सुविचार आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याआधी हे लक्षात घेतले पाहिजे असे वडीलधारी सांगतात. खामगावच्या योगेशने हा सुविचार वाचला असता , तर ही वेळ आली नसती. विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांना पाहून चुकीचे बोलल्याने योगेश कोकाटे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 घटना हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत घारोड गावातील आहे. याबाबत एका महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली, ती व तिची देरानी आणि नणंद अश्या तिघीजणी गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी गावातीलच योगेश कोकाटे हा तिथे उपस्थित होता. महिलांना पाणी भरताना पाहून तो त्यांना वाईट उद्देशाने बोलला. एवढेच नाही तर पाठलाग करत घरापर्यंत गेला. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी योगेश विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.