मालकीचा नसलेला प्लॉट विकला!

शेगावच्या दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल
 
शेगाव शहर पोलीस ठाणे
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मालकीचा नसतानाही खोटे बोलून प्लॉट विकून अडीच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार शेगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आज, १९ नोव्‍हेंबरला दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
गजानन वसंतराव पिसे (३७, रा. गांधी चौक, शेगाव) यांच्‍यातर्फे पोहेकाँ साहेबराव सोनवणे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. युवराज रावसाहेब देशमुख (३२, रा. आदर्शनगर स्टेट बँक कॉलनी शेगाव) व अशोकराव देशमुख (३२, रा. व्यंकटेशनगर शेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना १० जून २०१३ ते ५ मे २०१८ दरम्‍यान घडली आहे. पिसे आणि देशमुख दोघेही ओळखीचे आहेत. दोन्‍ही देशमुखांनी पिसे यांना मालकीचा नसतानाही एक प्लॉट दाखवला. तो प्लॉट त्‍यांना विकण्यासाठी खोटे बोलले. खोटी सौदा चिठ्ठी करून दिली. या चिठ्ठीच्या आधारे अडीच लाख रुपये देशमुखांना देण्यात आले, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक नितीन इंगोले करत आहेत.