संतापजनक! बायकोला प्रचंड छळले; पैशाची भूक होती! ३ वर्षाच्या चिमुकलीचीही नाही केली कदर! बुलडाण्याच्या लेकीने पोलीस ठाणे गाठून सांगितली आपबिती..

 
crime

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह  वृत्तसेवा):विवाहितेचा सतत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अकोला येथील सासरच्या ११ जणांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारासह विविध कलमान्वये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या सौ. रुपाली यांचे अकोला येथील पंकज धोत्रे यांच्यासोबत ८ मे २०१५ रोजी विवाह झाला. पंकज हा पुणे येथील एचएसबिसी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. लग्न झाल्यानंतर १ वर्ष त्याने सुखाने संसार केला. मात्र कालांतराने पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. पंकजला दारूचे व्यसन असून तो दररोज दारु पिऊन घरी यायचा. घरी आल्यावर मारहाण करायचा. माहेरवरून १० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेकडे सतत तगादा लावत असे. यामध्ये विवाहितेचे सासू, दीर, नणंदा, नंदई, चुलत सासरे सुद्धा मदत करायचे. माझ्या वडिलांनी लग्नात खूप खर्च केला. आता पुन्हा तुम्हाला कुठून पैसे देतील? अशी विनवणी विवाहिता करीत होती. मात्र तिचे कुणीच ऐकत नसे. सतत टोमणे मारणे, शारीरिक, मानसिक छळ करणे सुरु असायचा. पतीची वागणूक आज नाही तर उद्या सुधारेल या आशेपोटी विवाहितेने त्याच्यासोबत संसार केला. परंतु त्याच्या वागणुकीत कोणताच बदल झाला नाही. अखेर सततची मारझोड, मानसिक त्रास सहन होत नसल्याने विवाहितेने सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

या तक्रारीवरून पती पंकज मनोहर धोत्रे रा. धानोरी पुणे, सासू श्रीमती सुमित्रा मनोहर धोत्रे सेवानिवृत शिक्षिका रा. गायत्री नगर अकोला, सौ. पद्मा नितीन नेमाने-धोत्रे रा. बुलढाणा, श्री व सौ स्मिता अनिरुद्ध भुयार रा. अष्टविनायक कॉलनी अकोला, श्री व सौ वैशाली संतोष काटोले रा. व्ही. एच. बी. कॉलनी अकोला, नम्रता व आशीष गणेश धोत्रे रा कौलखेड अकोला, गणेश शंकर धोत्रे रा. निसर्ग गार्डन, जे एन मार्ट रोड, खडकी, अकोला,
दिनकर धोत्रे रा गजानन मंदिर, व्ही. एच. बी. कॉलनी अकोला यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पित्याला मुलीचीही नाही कदर

पंकज धोत्रे याला ३ वर्षाची मुलगी आहे. वडिलांचा आपल्या मुलीत खुप जीव असतो. मात्र पंकज धोत्रे याने पत्नीस ३ वर्षाच्या चीमुरडीसह घराबाहेर काढल्यानंतर तिची साधी चौकशी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला नाही यावरून असे दिसून येते की त्याला मुलीशीही काहीच घेणेदेणे नाही. तिचे शिक्षण, पालनपोषण या जबाबदारीकडे त्याचे लक्ष नाही. पत्नी गरोदर असतांनाही त्याने कुठलीच बाब गांभीर्याने घेतली नाही. तिचा वेळेवर दवाखाना केला नाही. पत्नीला घरातून काढून दिले तेंव्हा चिमुकल्या मुलीचा देखील विचार केला नाही.