संतापजनक! कायद्याचा रक्षक झाला भक्षक; सव च्या पोलीस पाटलाचा कारनामा ! ९ वर्षाच्या चिमुकलीसोबत नको ते केलं..!

 
Uahwhs
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील सव येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळून पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलाचा चावटपणा समोर आला आहे. मंदिर परिसरात खेळणाऱ्या ९ वर्षीय चिमुकलीचा पोलीस पाटलाने विनयभंग केलाय. पिडीत मुलीच्या आईने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग करणाऱ्या पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार सव येथील ३४ वर्षीय महिलेने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. घटना ९ जून रोजी घडली आहे. महिलेची ९ वर्षीय मुलगी घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तिच्या ६ वर्षीय मैत्रिणीसोबत घराजवळील मारोतीच्या मंदिरावर खेळत होत्या. काही वेळात ९ वर्षीय चिमुकली घाबरत घाबरत घरी आली, तिच्या आईने तिला कारण विचारले. त्यावेळी तिने सांगितले की "गावचे पोलीस पाटील मारोती किसन पवार याने तिला वर उचलले, चुकीच्या ठिकाणी बोटाने वारंवार स्पर्श केला त्यानंतर तिला खाली बसवून तिच्या हातावर हात ठेवला.." घडल्या प्रकाराची भीती वाटल्याने मुलीने घाबरत घाबरत घर गाठले. घडला प्रकार एकूण मुलीच्या आईने पोलीस पाटलाला जाब विचारला मात्र तरीही त्याने कोणतेही उत्तर दिले नसल्याने मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलीस पाटील मारोती किसन पवार विरुद्ध पोस्को सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.