संतापजनक! १२ वर्षीय मुलीचा पाठलाग करत पकडले, पडक्या घरात नेले अन् नको ते केलं.. बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा..

 
मोताळा
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत एका १२ वर्षीय मुलीसोबत चीड आणणारी घटना घडली आहे. गावातील एका तरुणाने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार बोराखेडी पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानुसार श्रीकृष्ण सोनोने (२१ वर्ष) या युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 
  प्राप्त माहितीनुसार , ९ एप्रिलला पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार पिडीत १२ वर्षीय मुलगी गावातील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता, गावातीलच श्रीकृष्ण सोनोने याने पाठलाग केला.त्यांनतर पिडीतेला एका पडक्या घरात ओढून तिला वाईट उद्देशाने मिठी मारली. यावेळी पिडीत मुलीने आरडाओरड केला असता, कुणाला काही सांगितल्यास आरोपी  याने जिवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी श्रीकृष्ण सोनोने याच्यावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.