संतापजनक! तिच्या गालांवर, मानेवर पप्प्या घेतल्या, ती सोडा सोडा म्हणत होती पण तो हैवानच! खामगावच्या सुटाळपुऱ्यात २४ वर्षीय तरुणीसोबत वाईट घडल..

 
Hdhdh
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अत्याचार करणाऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिक्षा होत नसल्याचा हा परिणाम असावा कदाचित. विनयभंग, बलात्कार, अपहरण या घटना जिल्ह्यात सातत्याने घडतच आहेत, पोलीस त्यांच्यापरीने या घटना रोखण्याचा प्रयत्न करीत असेल तरी पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांना यश मिळालेले दिसत नाही. घटना घडल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करतात मात्र घटना होऊच नये याकरिता प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. खामगावच्या सुटाळपुरा भागात एका २४ वर्षीय तरुणीसोबत २२ ऑगस्टच्या रात्री विपरीत घडल. घराशेजारी राहणाऱ्या एका नराधमाने तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी तरुणीची आई घरी नव्हती, लहान बहीण मैत्रिणीच्या घरी गेली होती. याचाच फायदा शेजाऱ्याने घेतला. तरुणीच्या आईने याप्रकरणाची तक्रार दिली असून पोलिसांनी नराधम शेजाऱ्याविरुद्ध दाखल केला आहे.
 प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी २४ वर्षांची आहे. २२ ऑगस्टच्या रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. पिडीत तरुणीची आई त्यावेळी ड्युटीवर गेली होती तर लहान बहीण मैत्रिणीच्या घरी गेलेली होती. घराशेजारी राहणारा नराधम त्यावेळी तरुणीच्या घराबाहेर गेला.
तरुणीला आवाज देऊन मला तुझ्या आईने पोथीचे पाने द्यायला सांगितले आहे असे म्हणत तो तरुणीच्या घरात घुसला. वाईट उद्देशाने पीडितेच्या उजवा हात पकडुन जवळ ओढले व मागून मिठीत ओढले. तरुणीच्या अंगाला त्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला, गालांवर मानेवर पप्प्या घेतला. यावेळी तरुणी आरोपीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती, मला सोडा सोडा असे म्हणत ती ओरडत होती मात्र नराधम तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर तरुणीने आरोपीच्या हाताला झटका देऊन ती खोलीत पळाली व आतून दरवाजा लावून घेतला त्यानंतर नराधम शेजाऱ्याने तिथून पळ काढला. जातांना ही घटना कुणाला सांगू नको अशी धमकीही त्याने दिली. अशी तक्रार तरुणीच्या आईने दिली आहे. खामगावच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.