संतापजनक! आता जिल्हापरिषद शाळेच्या हेडमास्तरचा चावट कारनामा! चौथीच्या मुलीकडे पाहून नियत फिरली; शेगाव तालुक्यातील घटना
Nov 7, 2023, 22:24 IST
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून अशीच संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या ५३ वर्षीय हेड मास्तरची चौथ्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीला पाहून नियत फिरली. त्याने तिच्यासोबत नको ते केलं. पिडीत चिमुकलीच्या आईने आज,७ नोव्हेंबरला शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. मनोहर रामभाऊ उंबरकर( रा. रोकडीया नगर, शेगाव) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
पिडीत मुलगी शेगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकते. घटना ६ नोव्हेंबरची आहे. पिडीत मुलगी आणि तिची ८ वर्षीय बहीण दोघे शाळेत होत्या. मुलीची आई आणि वडील शेतात गेलेले होते. दरम्यान दुपारी मुख्याध्यापक उंबरकर याने वर्गात कुणी नसतांना डेक्स बेंच पुसण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला वर्गात बोलावले. मुलीला पाहून हेडमास्तरची नियत फिरली. "आपण तोंडात तोंड टाकू" असे म्हणत मुलीसोबत अश्लील चाळे केले. असाच प्रकार हेडमास्तर उंबरकार याने शनिवारी खिचडी वाटण्याच्या वेळेला देखील मुलीसोबत केला होता. मुलीला घडला प्रकार कसातरी किळसवाणा वाटला.
मुलीने शाळा सुटल्यावर घरी येऊन आईला शाळेत घडलेला प्रकार सांगितला. रात्री उशीर झाल्याने पीडित मुलीच्या आईने आज शेगाव शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यावर मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.