संतापजनक! पाचशेच्या नोटा दाखवत अल्पवयीन मुलीला म्हणे, माझ्या सोबत चल! शेगाव पोलीस ठाण्यात युवकाविरुध्द तक्रार..

 
शेगाव
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव शहरातून एक अतिशय संतापजनक बातमी समोर येते आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या घरासमोर येवून युवकाने पाचशेच्या नोटा दाखवत वाईट उद्देशाने हातवारे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने शहर पोलिसांत तक्रार दिली, यावरून पोलिसांनी युवका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

   राहुल कान्हेकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. २५ जून रोजी तो पिडीत मुलीच्या घरासमोर आला होता. पाचशे रुपयांच्या दोन नोटा त्याने दाखवल्या. तसेच माझ्यासोबत चल, असे तो म्हणाला. वाईट उद्देशाने हातवारे करत असताना पिडीतेच्या आईला तो दिसून आला. तेव्हा पिडीत मुलीच्या आईने त्याला हटकले असता त्याने तेथून पळ काढला. असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी राहुल कान्हेकर याच्या विरोधात पोस्को कायद्यानुसार व इतर कलमानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.