संतापजनक! चिखलीच्या किन्नरावर मलकापुरात लैंगिक अत्याचार; केस कापले अन्...४ ते ५ जणांनी....

 
Ryg
बुलडाणा(बुलडाणा लाव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांनी शंभरी पार केल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने आज दुपारी प्रकाशित केले होते.दरम्यान आता पुन्हा जिल्ह्याला हादरवून टाकणारे वृत्त मलकापूरातून पुढे आले आहे. व्यक्तिगत कामासाठी मलकापूरात गेलेल्या चिखलीच्या २३ वर्षीय किन्नरावर सामूहिक लैंगिक अत्याचार झालाय..पीडित किन्नरावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत नोंद नाही..
पिडीत किन्नराने स्वतः बुलडाणा लाइव्ह ला याबद्दल सांगितले. घटना गुरुवार ,२८ डिसेंबरची आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी पिडीत किन्नर चिखलीतून मैत्रिणीला भेटण्यासाठी मलकापूरातील एका लॉजवर गेली होती.आपल्या किन्नर समूहात नवीन चेहरा दिसल्यामुळे त्याठिकाणी मलकापुरातील किन्नरांची टोळी जमली. परंतु मला तुमचे काम करायचे नाही मी पोलीस भरतीची तयारी करत आहे असे पीडित किन्नराने त्या टोळीला सांगितले. मात्र तिथल्या टोळीने त्याला उचलून त्यांच्या अड्ड्यावर आणले. 
  त्यानंतर गावगुंडाना बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. केस कापण्यात आले. सध्या पीडित किन्नरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याचे तिने बुलडाणा लाइव्ह ला सांगितले...