वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकालाच बदडले! बुलडाणा शहरातील घटना.

 
Psb
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील परदेशी पुरा भागात वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
  यासंदर्भात दीपक हडाले यांच्या तक्रारीवरून साहिल जाधव, अमित राजभोज,राहुल इंगळे, आणि प्रेम या (रा.भीमनगर) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटना रविवारची आहे. 
शहरातील परदेशी पुरा भागात दीपक हाडोळे हे आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी कुंदन बेडवाल (रा.रामदेवजी नगर )याचा त्या चौघांशी वाद सुरू होता. तेव्हा दीपक हाडोळे यांनी "कुंदनला मारू नका असे म्हटले असता चौघांनी त्यांना लोटपाट केली,मारहाण सुरू केली.त्यातील साहिल जाधव याने हातातील काठीने कपाळावर, पाठीवर मारले. इतर तिघांनी बेदम मारहाण केली. दीपक हाडोळे यांचा पुतन्या अक्षय हाडळे त्याठिकाणी होता . त्याने सोडवा सोडव केल्यानंतर दीपक हाडोळे यांनी शहर पोलीस ठाणे गाठले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविले. तपासणीनंतर त्यांनी पोलीस ठाण्यात त्या चौघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.