बायकोला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या नवऱ्यालाच बदडले! ७ जणांविरुद्ध गुन्हा, खामगावची घटना..
Jul 2, 2024, 09:23 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला सात जणांनी मिळून बदडल्याची घटना खामगाव शहरातील नांदुरा रोड परिसरात घडली. याबाबत पती पवन भगत याने दिलेल्या तक्रारीवरून, सात जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० जून रोजी कपिल मिश्रा आणि घरासमोर येऊन फोन भगत यांच्या पत्नी शिवीगाळ केली. पवन घरी आल्यानंतर पत्नीने याबाबत सांगितले. त्यामुळे जाब विचारण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी पवन याने कपिल मिश्रा याला नांदुरा रोडवरील ढोर दवाखान्यासमोर बोलाविले. त्यावेळी कपिल मिश्रा हा मित्र शुभम मिश्रा, सुमित वासकर व इतर चौघांना घेऊन तिथे आला. पवनाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता या सातही जणांनी संगणमत करून त्याला मारहाण केली. व जिवे मारण्याची धमकीही दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.