Amazon Ad

रानडुकराची शिकार व मांस विक्री प्रकरणी पळसखेड नागो येथून एकाला केली अटक!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पळसखेड नागो येथे कारवाई करत एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई आज 16 मार्चला सकाळी करण्यात. त्याच्याकडून 19 किलो रान डुकराचा मांस, 2 सुरे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आला आहे. आरोपी अजय वाघा राठोड विरुद्ध विविध कलमान्वय वनगुन्हा दाखल करण्यात आलं आहे.पुढील तपास बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे करत आहे

 याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की,बुलढाणा तालुक्यातील मौजे पळसखेड नागो येथे एक इसम रानडुकराचे शिकार करून त्याचे मास विकणार आहे,अशी गुप्त माहिती बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज 16 मार्चला सकाळी 9 वाजेच्या सुमारास सापळा रचून पळसखेड नागो येथील अजय वाघा राठोड वय 50 वर्षे यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी कडून जवळपास 19 किलो रानडुकराचे मांस, वजन काटा, दोन सुरे आणि एक ऊस कापण्याचा कोयता व इतर भांडे जप्त करून आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण व भारतीय वन अधिनियमानुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आरएफओ अभिजीत ठाकरे करत आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक सरोज गवस यांच्या मार्गदर्शनात वनपाल एच.डी. वानखेडे, वनपाल मोहसिन खान,वनरक्षक कु.मीरा बोरकर,बी.ए.घुले, पी.पी.मुंडे, वाहन चालक संदीप मडावी, प्रवीण सोनुने, अमोल चव्हाण, दीपक गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.जप्त मांस जाळून नष्ट करण्यात आले.