एकीकडे नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा होत असतांना कोमलच्या मनात मात्र वेगळच काही सुरू होत! १८ व्या वर्षीच....! नांदुरा तालुक्यातील घटना

 
Dhcv
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तसे तिचे वय भविष्याचा विचार करण्याचे...सुखद स्वप्न रंगवण्याचे...मात्र काय झालं कुणास ठाऊक...एकीकडे नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा होत असतांना तिच्या मनात मात्र वेगळच काही सुरू होत...जे सुरू होत, तेच तीन केलंही...नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे काल, १ जानेवारीच्या दुपारची ही घटना आहे..
 कोमल भाऊराव मानकर(१८) असे तरुणीचे नाव आहे. राहत्या घरात तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. कुटुंबियांच्या लक्षात ही बाब येताच तिला तातडीने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले,मात्र डॉक्टरांनी कोमलचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
  नांदुरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कोमल ने टोकाचा निर्णय का घेतला? यासाठी तिला कुणी प्रवृत्त केले का? यासंबंधीचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्याम आघाव करीत आहेत..