सणासुदीच्या दिवशी "पिता पुत्रावर" काळाचा घाला! कारची दुचाकीला समोरासमोर धडक; पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर.. हतेडी खुर्द शिवारातील घटना..

 
Gjhc
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): पिता पुत्र शेतातील कामे आटोपून घरी जात असताना अचानक  कारने समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू  तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.  आज २४ मार्च, रविवार दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास हातडी खुर्द शिवारात ही घटना घडली. 

Ghjb

 शिवाजी म्हातारजी चव्हाण (५५ वर्ष ) असे मृतकाचे नाव आहे.   डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा विशाल शिवाजी चव्हाण (२८ वर्ष) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे बापलेक केसापूर येथील शेतातील काम आटोपुन घरी माळविहीरकडे निघाले होते. मात्र मध्येच अल्टो कंपनीच्या चार चाकी वाहनाने हातडी खुर्द शिवारात त्यांना  समोरासमोर धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मृतक शिवाजी चव्हाण  यांचे शवविच्छेदनाचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवगृहात सुरू आहे. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छ. संभाजीनगर(औरंगाबाद) येथे हलवण्यात आले आहे.  तर अल्टोचालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर)याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.