वृद्धेचा विनयभंग करून मारहाण

बुलडाणा तालुक्‍यातील घटना
 
 
तुझ्या बायकोला घेऊन ये तेव्हाच घरात रहा; दोन भावांमध्ये हाणामारी; बुलडाणा तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५४ वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील सव येथे २० नोव्हेंबरला दुपारी दोनच्या  सुमारास ही घटना घडली.  वृद्धेने आज, २२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणात तक्रार दिली. तक्रारीवरून साहेबराव तेजराव गाढे (५८, रा. सव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वृद्धेच्या भावाचे व गाढे याचे शेत शेजारी शेजारी आहे. तिच्या भावाच्या शेतातील खुणा उपटल्याने तिने त्‍याला विचारणा केली. तेव्हा वाईट उद्देशाने हात धरून तिच्या साडीचा पदर गाढवे याने ओढला व स्प्रिंकलरच्या पाईपने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे जखमी अवस्थेत वृद्धेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. आज सुटी मिळाल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे करत आहेत.