अरे देवा ! चोरट्यांना पोलिसांचा धाकच नाही ! बिबी पोलीस ठाण्या जवळीलच हॉटेल फोडले!

 
बिबी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: जयजित आडे): लोणार जवळील बिबी येथे ६ जानेवारीला मध्यरात्री अज्ञातांनी माऊली हॉटेल फोडले. यामधून तब्बल १७ हजार रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच हॉटेल आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही ? असा सवाल चर्चेतून होतो आहे.
Mla
                       जाहिरात 👆
घटना उघडकीस आल्यानंतर हॉटेल मालक ज्ञानेश्वर भोकरे यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.द.वि कलम ४६१/३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोडक्यात घटनाक्रम असा की, ६ जानेवारीच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी माऊली हॉटेलचे टाळे फोडले. त्यानंतर गल्ल्यामधील नगदी रोख रक्कम (१७ हजार) चोरी केली. इतकच नाही तर हॉटेलमधील महागडे सामान व पदार्थांची देखील नासधूस करण्यात आली. इतक्यात बीबी परिसरात धाडसी चोरीची ही दुसरी घटना आहे असे कळते आहे. त्यामुळे पोलिसांचा चोरट्यावर धाक राहिला नाही! अशी चर्चा परिसरात सुरू आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४६१/३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ दिनेश चव्हाण करत आहेत.