अरेच्या..!आता तर चोरट्यांनी हद्दच केली; घरासमोरून चारचाकी गायब!जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील घटना..

 
Ggh
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):हल्ली जिल्ह्यात दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यातच आता चोरट्यांनी थेट घरासमोरून चारचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सतीश उदयभान गवई (४०) रा.टेभुर्णा यांनी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी एम एच १९ सी यु ३६७२ क्रमांकाची क्रूझर गाडी (किंमत ९ लाख रुपये ) विकत घेतली होती. ही गाडी ऋतिक दिनेश वाकोडे रा.माटरगाव याला चालविण्यासाठी दिली . ऋतिकच गाडीची देखभाल करतो. २३ जानेवारी २०२४ च्या रात्री ११ वाजता ऋतिक वाकोडे व विनेश वाकोडे यांनी नेहमीप्रमाणे ही गाडी नंदकिशोर श्रीराम अंबलकार रा. माटरगाव यांच्या घरासमोर लॉक करून उभी केली. ते दोघेही रात्री घरी निघून गेले. त्यांनतर २४ जानेवारीला सकाळी ८ वाजेच्या दरम्यान विनेश वाकोडे हा अंबलकार यांच्या घराजवळ आला मात्र त्याला तिथे गाडी दिसली नाही.गाडीचा सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने शेवटी तशी तक्रार गाडीचे मालक संतोष गवई यांनी २५ जानेवारी रोजी जलंब पोलीस स्टेशनमध्ये दिली. पुढील तपास पोहेकॉ सचिन बावणे करीत आहेत.