आक्षेपार्ह व्हिडिओचे स्‍टेटस...माटरगावमध्येही दोघांविरुद्ध गुन्‍हा

 
whats app
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन भिन्‍न धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल असा व्हिडिओ स्‍टेटसला ठेवणे माटरगावच्या दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. जलंब पोलिसांनी त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. शेख इरफान शेख हाशम (२६) आणि असलम खान अफसर खान (१८, दोघे रा. माटरगाव बुद्रूक) अशी गुन्‍हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार संजय उज्‍ज्वल पहूरकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली. इरफान आणि असलमने आक्षेपार्ह व्हिडिओ स्‍टेटसला टाकला होता. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होऊन सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्‍न त्‍यांनी केला. पोलिसांनी वेळीच ही बाब लक्षात घेऊन दोघांविरुद्ध कारवाई केली. तपास पोलीस उपनिरिक्षक राहुल काटकाडे करत आहेत.