इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट! धार्मिक भावना दुखावल्या; खामगावच्या लकी वाकोडे विरुद्ध गुन्हा

 
Gvb
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट करून इतरांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या तसेच दोन समाजात तेढ निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुषार सुरेश गुजर (१८) रा. चांदमारी याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
तुषार गुजर १३ मे रोजी मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर रिल्स पाहत असताना त्याला लकी नंदकिशोर वाकोडे रा. शंकर नगर याने केलेली पोस्ट आक्षेपार्ह दिसून आली. यामुळे इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून त्याचे हे कृत्य दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आहे. अशा तक्रारी वरून शहर पोलिसांनी लकी नंदकिशोर वाकोडे याच्या विरुद्ध कलम १५३अ, ५०५ (२), २९८ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.