बँक व्यवस्थापकाच्या अंगावर शाई फेकून शासकीय कामात अडथळा प्रकरण! मलकापूर न्यायालयाने दिली आगळीवेगळी शिक्षा; वाचा काय आहे प्रकरण..

 
court

मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील बँक व्यवस्थापकांच्या अंगावर शाईफेक करुन हमला व बलप्रयोग केल्याप्रकरणी आरोपी गजानन पुंडलीक ठोसर (रा. मलकापुर) व पुंजाजी प्रल्हाद कदम (रा. भाडगणी) यांना येथील तदर्थ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधिश एस. व्ही. जाधव यांनी दोषी ठरवत प्रकरणी त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे चांगले वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याचा निकाल दिला.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा, दाताळाचे शाखा व्यवस्थापक अविनाशकुमार झा हे ३० ऑक्टोंबर २०१५ रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह बँकेत काम करीत होते. त्यावेळी आरोपी गजानन पुंडलीक ठोसर (रा. मलकापुर), पुंजाजी प्रल्हाद कदम ( रा. भाडगणी) व मोहन नंदकिशोर पाटील (रा. दाताळा) यांनी बँकेत जाऊन पुंजाजी प्रल्हाद कदम याचे कर्ज प्रकरण नामंजुर केले म्हणुन बँकेत गोंधळ घातला. ऐवढ्यावरच न थांबता कर्जप्रकरण मजुर करण्यासाठी शाखा व्यवस्थापकावर दबाव आणला. त्यानंतर गजानन ठोसर यांनी शाखा व्यवस्थापकास शिविगाळ करुन धमकावले तसेच त्याच्या अंगावर शाईची बाटली फोडल होती. 

  या प्रकरणी शाखाव्यवस्थापक अविनाशकुमार झा यांच्या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुध्द भादंविचे कलम ३५३, ३५५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस अंमलदार दिलीप देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी तसेच इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे झालेले पुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरुन विद्यमान न्यायालयाने आरोपी गजानन पुंडलीक ठोसर व पुंजाजी प्रल्हाद कदम यांना भा.द.वि. चे कलम ३५५ नुसार दोषी ठरवत त्यांच्याकडून पुढील एक वर्षाकरीता प्रत्येक २५ हजार रुपयांचे वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी यांनी काम पाहीले.