आता लुटमारीचीही समृद्धी! विश्रांती करत असलेल्या कुटुंबाला तिघांनी लुटले! एक लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास..

 
Ghhj
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) समृद्धी महामार्ग.. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर अपघात सुरू आहे. अपघातांची मालिका सुरू असतानाच एक अतिशय खळबळजनक घटना समृद्धी महामार्गावर घडली. कारमध्ये आराम करत असलेल्या धाराशिवच्या कुटुंबाला तिघांनी लुटल्याची घटना काल १० मेच्या पहाटे घडली. चोरट्यांनी कारमधील एक लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास करून पळ काढला आहे. 
धाराशिव येथील ऋषिकेश दूरगुळे यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली की , समृद्धी महामार्गावरील डोणगाव जवळील पेट्रोल पंपच्या सर्विस रोडवर त्यांनी त्यांचे एम.एच १२ जेसी १९१९ क्रमांकाचे वाहन थांबविले होते. कुटुंबांसोबत आराम करण्यासाठी ते थांबले होते. यावेळी त्यांच्या वाहनाजवळ अज्ञात तीन जण आले. चाकूचा धाक दाखवून फिर्यादी ऋषिकेश दुरूगुळे यांच्या खिशातील दोन हजार रुपये रोख काढून घेतली. गाडीमध्ये असलेल्या बॅगीतील दोन लॅपटॉप किंमत ४० हजार, त्यांची बहिण निघाली यांची २० ग्रामचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत एक लाख, सोन्याची अंगठी किंमत १५ हजार असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून तिघे अज्ञात पसार झाले. प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.