पारडा दराडे सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव! सरपंचाच्या कारभारात मुलगाच करीत होता हस्तक्षेप! सरपंच सदस्यांशी उद्धटपणे वागायच्या म्हणे...

 

लोणार(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): तालुक्यातील पारडा दराडे- धायफळ गट ग्रामपंचायतीच्या सरपंच कौताबाई बाबुराव ढाकने यांच्याविरोधात ग्राम पंचायत सदस्य संतोष कडुजी गावंडे, उपसरपंच द्रोपदा लक्ष्मण दराडे यांच्यासह पाच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

psc

नऊ सदस्य संख्या असलेल्या तालुक्यातील पारडा दराडे - धायफळ ग्राम पंचायतच्या विद्यमान सरपंच कौताबाई बाबुराव ढाकने १० फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचपदी निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची कामे करताना उपसरपंच आणि सर्व सदस्यांना कधीही विश्वासात घेतले नाही, त्यांच्या कारभारात मुलगा पंढरी ढाकने यांचा हस्तक्षेप वाढला असून सरपंच कौताबाई ढाकने व सदस्य आणि उपसरपंच यांना उद्धट वागणूक देतात, गावात विकासकामे करत नाहीत, ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत, ग्रामस्थांना योजनेचा लाभ देण्यासाठी पैशांची मागणी करतात तसेच नियमानुसार ग्रामसभा घेत नाहीत, असा आरोप करून सदस्य संतोष कडुजी गावंडे, उपसरपंच दराडे यांच्या सह पाच सदस्यांनी सरपंच कौताबाई ढाकने यांच्या विरुद्ध ६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी ग्राम पंचायत कार्यालयात दुपारी १२ वाजता अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ लिपिक दिलीप गौड यांनी सदस्यांना नोटीस बजावल्या आहेत.

उपसरपंचसह ६ सदस्य सहलीवर

नऊ सदस्य असलेल्या पारडा दराडे- धायफळ ग्राम पंचायतीच्या सरपंचा विरुद्ध ६ सदस्यांनी ६ सप्टेंबर रोजी अविश्वास दाखल करून सहलीवर निघून गेले आहेत. सरपंचा या बाजूने लीलाबाई सुट्टे या एकमेव सदस्या असून ११ सप्टेंबरला सरपंचा वरील अविश्वास ठरावावर निर्णय होणार असल्याने ग्रामस्थांचे लक्ष याकडे लागून आहे.