NEWS FOLLOW UP क्रिष्णा कऱ्हाळे हत्याकांडात धक्कादायक खुलासा! किती क्रूर आहे आरोपी रुपेश वारोकार; बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईन...
Aug 1, 2024, 09:53 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शॉटकर्टने पैसा कमावण्याची हाव चांगल्या चांगल्यांची मती भ्रष्ट करते.. मग यातूनच घडतात ते गुन्हे..शेगाव तालुक्यातील नागझरी येथील क्रिष्णाचे हत्यांकाड जिल्हा हादरवणारे ठरले.. या हत्याकांडात आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्यांकाडाला रेतीची देखील किनार आहे..आता तुम्ही म्हणाल १४ वर्षाचा निरागस क्रिष्णा अन् हत्याकांडाला रेतीची किनार हे असं कसं काय? तर थोड थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...
तारीख होती २३ जुलै...शेगावच्या बुरुंगले विद्यालयात शिकणारा नागझरी येथील कृष्णा कराळे हा शिकवणी वर्गासाठी गावातील ऑटोने शेगावमध्ये पोहचला..शिकवणी वर्ग आणि शाळा करून तो दररोज संध्याकाळी घरी यायचा मात्र त्यादिवशी तो घरी आलाच नाही..त्यामुळे सगळीकडे शोधाशोध सुरू होती..त्या दिवशी कृष्णाची आई आजारी असल्याने त्याची आई आणि वडील दोघे अकोल्यात होते.. कृष्णा घरी परतला नाही म्हणून सगळेच चिंतेत होते..त्याच दिवशी रात्री उशिरा कृष्णाच्या अपहरणाची तक्रार शेगाव शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..
याच दिवसाच्या आदल्या दिवशी चिखली तालुक्यातील आंबाशी येथेही १० वर्षीय अरहानचे अपहरण करून खून केल्याची घटना घडल्याने पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले..२४ जुलैला कृष्णाच्या अपहरणाच्या बातम्या माध्यमांत छापून आल्या..तपासादरम्यान पोलीसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले..त्यानुसार २३ जुलैला सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार याच्या मोटार सायकल वर बसून कुठेतरी जात असल्याचे दिसत होते..विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस ठाण्यात देखील होता..
त्यावेळी त्याला विचारणा केली असता "तो मी नव्हेच" अशी भूमिका त्याने घेतली..मात्र गाडीचा नंबर प्लेट आणि संशयास्पद वर्तनावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली, त्याने आधी काहीही सांगायला नकार दिला..पोलिसांची दिशाभूल करीत राहिला..शेवटी क्रिष्णाला घेऊन भास्तन जवळील नदिपात्राजवळ गेल्याचे त्याने सांगितले, मात्र तिथून गावातील दुसऱ्याच व्यक्तीच्या सोबत क्रिष्णा गेल्याचे रुपये सांगत राहिला...२४ जुलैच्या रात्री रुपेश ला घेऊन पोलीस भास्तनच्या जंगलात गेले मात्र रुपयेशने तोपर्यंत पोलिसांना पूर्ण स्टोरी सांगितलीच नाही...
२४ जुलैच्या या घटना क्रमानंतर दिवस उजाडला २५ जुलै चा..गुरे चारणाऱ्या दोघांना भास्तनच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेतील क्रिष्णाचा मृतदेहच आढळला.. मृतदेहाशेजारी त्याची शाळेची बॅग, हातोडा, पोतडी असे साहित्य सापडले. एसपी ॲ
डिशनल एसपी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला... संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या रुपेशला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने खुनाची कबुली दिली..त्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की क्रिष्णाचा खून हा खंडणी मागण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे...
मात्र या घटना क्रमांनंतरही अनेक प्रश्नांची उत्तरे बाकी होती.. आरोपीने खंडणी मागण्याच्या उद्देशाने खून केल्याचे पोलीस सांगत होते, मात्र क्रिष्णाचे अपहरण केल्यानंतर कृष्णाच्या कुटुंबीयांना खंडणी मागण्यासाठी आरोपींकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नव्हता.. त्यामुळे खूनाचे कारण खंडणी की आणखी काहीतरी असे प्रश्न उपस्थित होत होते.. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दोन दिवसांचा पिसीआर मागितला..त्यामुळे या दिवसांत आरोपींच्या चौकशीतून आणखी काही समोर आले का? याच्या खोलात शिरण्याचा "बुलडाणा लाइव्ह" ने प्रयत्न केला, तेव्हा धक्कादायक आणि हादरवून सोडणारे खुलासे समोर येत गेले..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रुपेश हा कर्जबाजारी होता..३ जणांचे त्याला पैसे देणे होते.. ज्यांच्याकडून रुपेशने पैसे घेतले होते ते लोक रुपये च्या घरी चकरा मारायचे, त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा कसा याचा विचार रुपेश करत होता.. दुसरीकडे क्रिष्णाच्या वडिलांनी घराचे बांधकाम हाती घेतले होते..घराच्या बांधकामासाठी रेतीची गरज होता.. गावाशेजारीच पूर्णा नदी असल्याने रुपेश हा रेतीचा पुरवठा करायचा..त्यामुळे घटनेच्या काही दिवस आधी कृष्णाचे वडील राजेश कराळे आ रूपेशला भेटले होते त्यावेळी वडिलांसोबत क्रिष्णा देखील होता. तेव्हा घर बांधकामासाठी रेती पाहिजे असे क्रिष्णाचे वडील रुपेशला म्हणाले होते, त्यावर पाहू असे उत्तर रुपेशने दिले होते...
इकडे कर्जबाजारी झालेल्या रुपेशच्या डोक्यात भलताच कट शिजत होता. क्रिष्णाचे अपहरण करून ५ लाख रुपयांची खंडणी वसुल करायची आणि कर्ज फेडायचे असा प्लॅन त्याने रचला..२३ जुलैच्या आदल्या दिवशी म्हणजेच २२ जुलैला रूपेशने एक हातोडा विकत घेतला..एखाद्याला बेशुद्ध कसे करायचे याची माहिती त्याने इंटरनेटवरून मिळवली..२३ जुलैला सकाळी ७: ५० च्या सुमारास रुपेश क्रिष्णाला भेटला..तुम्हाला रेती पाहिजे होती ना, चल तुला रेती दाखवतो असे म्हणत त्याने क्रिष्णाला मोटर सायकल वर बसवले.. आधी क्रिष्णाला घेऊन तो एका खदानीजवळ गेला..मात्र ती जागा काही रुपेशला सुरक्षित वाटली नाही..त्यामुळे रुपेश क्रिष्णाला घेऊन भास्तन येथील जंगलात गेला.. क्रिष्णाला मारहाण करून बेशुद्ध शुद्ध करायचे, त्यानंतर त्याला पोतडीत टाकायचे , पोतडी वरून बांधून घ्यायची आणि नंतर खंडणी मागायची असा विचार रूपेशच्या डोक्यात होता..मात्र जंगलात गेल्यावर भलतेच घडले.. रुपेशने क्रिष्णाच्या डोक्यात हातोडा मारला..मारहाण जबर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला..त्यामुळे रुपेशने तिथून पळ काढला...आता या सगळ्या घटनाक्रमात आरोपी क्रमांक २ पृथ्वीराज मोरे हा तर कुठेच दिसत नाही...आधी रूपेशनेच पृथ्वीराज आपल्या सोबत असल्याचे पोलिसांना सांगितले होते, मात्र खोलात तपास केल्यानंतर दुसऱ्या आरोपीचा प्रत्यक्ष घटना घडतेवेळी काहीही संबंध नसल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे..
घटनेचा दिवशी आरोपी क्रमांक २ पृथ्वीराज हा जिथे होता त्याचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले..मात्र असे असले तरी आरोपी क्रमांक २ याला देखील आरोपी करण्याच्या भूमिकेवर पोलीस ठाम आहेत..कारण घडलेली हकीकत रूपेशने सर्वात आधी पृथ्वीराज यालाच सांगितली होती..मात्र हे सगळे माहीत असताना रुपेशला वाचवण्यासाठी ही बाब लपवून ठेवत रुपेशला पृथ्वीराजने आश्रय दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.. या हत्याकांडात वापरण्यात आलेला हातोडा, पोतडी यासह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.. सुरुवातीपासूनच रुपेश पोलिसांची दिशाभूल करणारे उत्तर देत होता, आता देखील पोलिसांनी आरोपीची दोन दिवसाची कोठडी मागितली आहे..त्यामुळे या दोन दिवसांत आरोपी आणखी काही वेगळे खुलासे करतात का हे याकडेही सगळ्यांचे लक्ष राहील...एकंदरीत चिमुकल्या क्रिष्णाच्या हत्याकांडाला रेतीची देखील किनार असल्याचे दिसत आहे..मात्र कारण काहीही असुदेत चिमुकल्या क्रिष्णा सोबत जे घडले ते अंत्यंत वाईटच...