दिवाळीला माहेरी आलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

 
File Photo
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नानंतर पहिल्याच दिवाळीला माहेरी आलेल्या नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना काल, ११ नोव्हेंबर रोजी नरवेल (ता. मलकापूर) येथे घडली. सौ. शुभांगी विजय डाबेराव (१९) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
शुभांगी दिवाळीनिमित्त नरवेल (ता. मलकापूर) येथे माहेरी आली होती. काल सकाळी ९ वाजता तिने विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काल सायंकाळी साडेपाच वाजता तिचा मृत्यू झाला. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.