BREAKING अंबाशी प्रकरणात नवे अपडेट! चिमुकल्या अरहानचा सख्ख्या आतेभावानेच केला मर्डर; आधी गळा आवळून खून केला, पोत्यात घालून शेणाच्या उकीरड्यात पुरले...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंबाशी येथील १० वर्षीय अरहानच्या खुनाने जिल्हा हादरला आहे. परवाला म्हणजेच २२ जुलैला अरहानचे अपहरण झाले होते. काल,२३ जुलैच्या रात्री या प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान अरहानचा खून हा त्याच्या सख्ख्या आतेभावानेच केला असल्याची माहिती समोर आली आहे. शेख अन्सार (२२) असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच राहणारा आहे. शेख अन्सार याने मामेभाऊ अरहानचा दोरीने गळा आवळून खून केला, त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकला आणि घराशेजारच्या शेणाच्या उकिरड्यात पुरला, सख्ख्या मामे भावाचा अशा निर्दयतीने खून करत असताना अन्सारचे हात जराशेही कापले नसतील का? असा सवाल आता उपस्थित होते... 
चिमुकल्या निरागस अरहानचा खून करण्याचा निर्णय अन्सारने का घेतला? खुनाचे नेमके कारण काय याबद्दल अन्सार अजून पोलिसांजवळ बोलला नाही..आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत खुनाचे कारण स्पष्ट होऊ शकते...