नांदुऱ्याचा कापड व्यापारी अपघातात ठार!

सख्खा भाऊ जखमी, नांदुरा तालुक्‍यातील दुर्घटना
 
 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना १० नोव्हेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास नांदुरा - जळगाव जामोद रोडवरील सुपो जिनिंगजवळ घडली. अपघातातील ठार व गंभीर जखमी दोघे सख्खे भाऊ आहेत.
शंकरलाल टेकचंद रामचंदाणी (५८) व जस्वंद टेकचंद रामचंदाणी (५२, दोघे रा. नांदुरा) या भावंडांचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. १० नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथील बाजार आटोपून दोघे भाऊ दुचाकीने नांदुऱ्याकडे येत होते. जळगाव जामोद रोडवरील सुपो जिनिंगजवळ (ता. नांदुरा) मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. धडकेत शंकरलाल जागीच ठार तर जस्वंद रामचंदाणी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नांदुरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.