लाजवाब धाब्याजवळ नांदुरा पोलिसांची 'लाजवाब' कारवाई; अवैध बायोडिझेलसह तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त !

 
Vbhb
नांदुरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):  नांदुरा मलकापूर रोडवरील लाजवाब धाब्याच्या जवळील एका टपरी मध्ये अवैधरित्या बायोडिझेल साठवून ठेवल्याची  माहिती नांदुरा पोलिसांनी मिळाली. तिथे छापा घालून पोलिसांनी बायोडीझेलसह    १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आज गुरूवार, २ मे रोजी नांदुरा पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पावणेसहा लाख रुपयांचा ८२०० लिटर पेट्रोल सदृश्य द्रव पदार्थ १० लाखांचे मालवाहू वाहन( ट्रक) , १३ बॅरेल,  इलेक्ट्रिक मोटर,  पाईप, डिझेल मशीन  असा एकुण १७ लाख  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून अब्दुल हमीद अब्दुल बासीत (४२ वर्ष) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय सतीश आडे हे करीत आहेत.