नांदुरा पोलिसांनी घरातून दोन तलवारी जप्त केल्या! दोन भावांच्या मनसुब्यावर फेरले पाणी; नांदुरा तालुक्यातील वडाळी ची घटना..!

 
nandura

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विनापरवाना अघरात दोन तलवार ठेवल्याप्रकरणी वडाळी येथील दोघा सख्या भावडांवर नांदुरा पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. दहशत किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बडाळी येथील रहिवासी असलेल्या राम सतीष वक्ते (वय २४ वर्षे) व महादेव सतीष वक्ते (वय २२ वर्षे) या दोघा भावंडानी घरात तलवार नावाचे शस्त्र ठेवलेले असल्याची गुप्त माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदुरा पोलिसांनी वडाळी येथे जाऊन वक्ते भावंडांच्या घराच्या झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांच्या घरातून अंदाजे चार हजार रुपये किंमतीच्या दोन तलवार मिळून आल्या. पोलिसांनी उपरोक्त तलवारी जप्त करत आरोपींना शस्त्र बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंविचे कलम ४, २५ व महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुठे हे करीत आहेत.