नांदुरा पोलिसांची कारवाई : गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त ; चार जणांना केली अटक !

 
नांदुरा
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) तब्बल १२ गोवंशीय जनावरांची वाहतूक रोखून वाहन जप्त करत नांदुरा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. काल गुरूवार ,७ मार्च रोजी पहाटे नांदुरा - मोताळा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. 
  
   १२ गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बोलेरो पिकप गाडीने जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. जळगाव जामोद येथून निघालेली ही (एम. एच.२८ बीबी.६३८५ क्रमांकाची)गाडी नांदुरा मार्गे मोताळ्याकडे निघाली होती.  
त्यामध्ये गाई , गोऱ्हे व वासरे असे गोवंश भरून नेण्यात येत होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नांदुरा पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी नांदुरा मोताळा रोड वरील उड्डाणपुलाजवळ सकाळी ४ वाजे दरम्यान नाकाबंदी केली. यावेळी, नांदूऱ्यावरून मोताळ्या कडे जाणाऱ्या वाहनाची झडती घेण्यात आली. त्यातील एकात ६ गाई ,४ गोऱ्हे , २ वासरू असे १२ एक लाख १४ हजार रुपयांचे पशुधन आढळून आले. या जनावरांना वेदनादायक स्थितीत दाटीवाटीने भरून, आखूड दोरीने बांधून जखमी अवस्थेत निर्भयपणे कोंबून भरल्याने जनावरांच्या अंगावर भरपूर जखमा झालेल्या होत्या. चालकाकडे जनावराच्या मालकी हक्काची व खरेदी विक्रीचे कोणते कागदपत्रे मिळून आले नाही. हे गोवंश कत्तलीसाठी जात असल्यामुळे पोहेकॉ संजय पडघान यांनी फिर्याद दिली. आरोपी धर्मराज उर्फ शिवदास गजानन जाणे वय २३ वर्षे रा गाडेगाव बु ता जळगाव (जामोद), सुनील रमेश कटारे वय २८वर्षे रा अकोला खुर्द, ता जळगाव (जामोद) किशोर ज्ञानेश्वर दरगे वय २२वर्षे रा करमोळा ता संग्रामपूर, मयूर गजानन चोपडे वय२२ वर्षे रा अकोला खुर्द ता जळगाव (जामोद )या चौंघा गो तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध कलम ११(१)(क),११(१)(घ),११(१) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ५(अ),(२),९महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६सहकलम ३४भादंवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले .पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुरलीधर वानखेडे, कर्मचारी पृथ्वीराज इंगळे, श्याम आघाव,संजय वराडे यांनी कारवाई केली आहे.