नांदुरा पोलिसांनी रंगलेल्या कार्यक्रमाचा बेरंग केला! नांदुऱ्याच्या नवदुर्गा उत्सव मंडळाने देवी बसवली, पण तिथेच पाप करीत होते...

 
Bdbdb
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):नांदुरा शहरातील नवदुर्गा उत्सव मंडळ दुर्गा नगर येथे भर दुपारी रंगलेल्या जुगाराच्या डावावर पोलिसांनी धाड टाकून चौदा आरोपींना रंगेहात पकडले आहे.
झाले असे की, नांदुरा शहरातील नवदुर्गा उत्सव मंडळ दुर्गा नगर येथे १६ आक्टोबर रोजी दुपारच्या २ वाजताच्या दरम्यान जुगाराचा डाव रंगल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एकूण चौदा जुगार बहादरांना रंगेहात पकडले आहे. यामध्ये १) दिनेश लक्ष्मण बसाने (वय ४० वर्ष रा. समोतीपुरा, २) गणेश दिनकर माळोदे (वय ३० वर्ष रा. दुर्गा नगर, नांदुरा) ३. राजेंद्र जनार्धन खंडागळे (वय ५३ वर्ष, रामाटोडा इ. मु.दुर्गा नगर नांदुरा) ४. संजय साहेबराव पाटील (वय ५८ वर्ष, रा. बालाजी नगर, नांदुरा) ५. संजय रघुनाथ काटे वय ४८ वर्ष, (रा.दुर्गा नगर, नांदुरा) ६. निंबाजी वामन इंगळे (वय ३७ वर्ष, रा. निमगांव ता नांदुरा) ७. नितीन भास्कर कल्याणकर (वय ३० वर्ष, रा.दहीगांव ता नांदुरा) ८. संतोष समाधान लाहुडकर (वय ४० वर्ष, रा. पोटळी ता. नांदुरा) ९. बापू नानासाहेब कुमावत (वय ४८ वर्ष, रा. दुर्गा नगर, नांदुरा) १०. प्रकाश विश्वनाथ सरोदे (वय ४१ वर्ष, रा. निमगावं ता नांदुरा ) ११. मधुकर सूर्यभान विभुते (वय ३७ वर्ष, रा. शेलगांव मुकुंद ता नांदुरा) १२. किशोर दिनकर घोटे (वय ४० वर्ष, रा. निमगाव ता नांदुरा) १३. दिनेश प्रभाकर उमाळे (वय ५५ वर्ष, रा. वडी ता नांदुरा ) १४. महेश राजेश वाकोडे (वय २० वर्ष, रा. नांदुरा या चौदा जणांना रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून एकूण नगदी १२,३००/- रुपये ,एका डावावर १.७९०/- रुपये ,साथ पत्ते - कि:00/- रु. असा एकूण नगदी १४०९० /- रुपये, ताश पत्ते किं.00/- रु. तसेच मोबाईल किं. ५७,५००/- रु असा एकूण ७१,५९० /- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकॉ श्रीकृष्ण देवराव हद्दे यांनी तशी तक्रार नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.