सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! वाद मिटवण्यासाठी गेलेल्या भावावरच.....! बिरसिंगपूरची धक्कादायक घटना

 
Poster
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरापासून जवळच असलेल्या बिरसिंग गावात एक कौटुंबिक वाद प्रकोपाला गेला. वाद आपसात मिटवण्यासाठी गेलेल्या भावावरच विळ्याने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना ९ जानेवारीला घडली. प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Rama
                        जाहिरात👆
सविस्तर वृत्त असे की, बिरसिंगपूर येथील गजानन प्राणकर यांचे त्यांच्या लहान भावाशी (समाधान प्राणकर यांच्याशी) ३१ डिसेंबरला भांडण झाले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल होते. ९ जानेवारीला ते चौकशी कामासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनतर वाद आपसात मिटवण्याच्या हेतूने लहान भाऊ समाधान याच्याकडे गेले. तुम्ही गुन्हा माघे घ्या आपण आपले भांडण आपसात मिटवू असे गजानन यांनी म्हटले असता भावाने व त्याची पत्नी ज्योतीने त्यांना शिवीगाळ केली. व लोटपोट करून परत जर आमच्या दारात आला तर जीवाने मारू अशी धमकी दिली.इतकचं नाही तर ज्योतीने विळा घेऊन गजानन यांच्या हातापायावर वार केला. आम्ही आपसात करणार नाही असे त्यांनी म्हटले असता गजानन प्राणकर तेथून निघून गेले असे बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.
तक्रारीवरून ज्योती प्राणकर, समाधान प्राणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे..!