साखरखेर्डा येथे तरुणाचा खून! आईवरून शिवी दिल्याचा राग आल्याने झाला गेम!

 
policestation
साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काल, १३ एप्रिलच्या रात्री साखरखेर्डा येथे १७ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. आईवरून शिवी दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे.
 

शेख आदिल शेख अकील असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून प्रशांत योगेंद्र गवई ( रा.सावंगी भगत) असे आरोपीचे नाव आहे. काल, १३ एप्रिलच्या रात्री दोघांत वाद झाला. त्या वादातून शेख आदिल शेख आदील याने प्रशांत ला आईवरून शिवी दिली. याचा राग अनावर झाल्याने प्रकरण हाणामारीवर पोहचले. प्रशांत ने आदील चा गळा आणि नाक दाबल्याने आकील जागेवर बेशुद्ध पडला. यावेळी उपस्थितांनी आदील ला आधी  साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. रात्री उशिरा डॉक्टरांनी आदील याला मृत घोषित केले. आदील चा भाऊ सोहील (२१) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करीत आहेत.