BIG BREAKING दगडाने ठेचून खून! घटनास्थळी रक्ताचा सडा; लव्हाळा - साखरखेर्डा रस्त्यावरील आज सकाळची घटना ​​​​​​​

 
kdjkd

साखरखेर्डा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सकाळीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून करण्यात आलाय.साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावर सवडद शिवारात ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला एका शेतात जाणाऱ्या रस्त्यावर हा मृतदेह  स्थानिक शेतकऱ्यांना दिसला. घटनेची माहिती ठाणेदार नंदकिशोर काळे यांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत अजून कळाले नाही, मात्र हॉटेल वर काम करणाऱ्या एका राजस्थानी कामगाराचा हा मृतदेह असल्याची चर्चा आहे.