महावितरणचा अभियंता निघाला खादाड; 'एसीबी' ची मलकापूर येथील कार्यवाही!

 
Hdhd
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
आज सोमवारी दुपारी एसीबीच्या बुलढाणा च्या पथकाने मलकापूर येथे ही कार्यवाही केली. आकाश क्षीरसागर असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून काही तासापूर्वी तो जाळ्यात अडकला. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

संबंधित कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्याच्या शेतातील वादळामुळे विजेचा अडवा झालेला खांब दुरुस्त करून देण्यासाठी त्याने तब्बल 20 हजारांची लाच मागितली होती.