मोटारसायकल पुलावरून कोसळली ! तरुणाचा जागीच अंत; चिखली तालुक्यातील डासाळा येथील घटना

 
accident
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील उदयनगर येथून बुलडाणा कडे जात असलेली मोटारसायकल डासाळा येथील पुलावरून कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत झाला. सूरज विलास पवार(२७) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून तो बुलडाणा शहरातील सागवन भागातील स्वामी समर्थ नगरातील रहिवासी होता
 

काही कामानिमित्त तो उदयनगर येथे आला होता.रात्री ८ च्या सुमारास घरी जात असताना त्याची मोटारसायकल डासाळा येथील पुलावरून कोसळली. या अपघातात तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अमडापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस करीत आहेत.