सासुने केस धरून खाली पाडले, नवऱ्याने दारू पिऊन मारले; जाऊने केस धरून गालात चापटा हाणल्या..! सासरा तर पराक्रमी! नणंद म्हणे,घर बांधायचेय २ लाख आण! चिखलीच्या गजानन नगरातील लेकीचा मंगरूळमध्ये छळ..

 
ps

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली शहरातील गजानन नगर भागात माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा माहेरी चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे अतोनात छळ झाला. पैशासाठी तिला अक्षरशः मारले, झोडले..अखेर वैतागलेल्या विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

स्वाती सचिन जाधव (२७) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. २०१५ मध्ये तिचा विवाह चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील सचिन जाधव याच्याशी झाला होता. तिला सुरुवातीला तीन वर्षे चांगले वागवले. मात्र त्यानंतर तिचा पैशासाठी छळ सुरू झाला. तिचा पती दारू पिऊन तिला मारहाण करत होता.
 

  स्वातीची सासू, सासरे स्वातीच्या पतीला पाठीशी घालत होती. नणंद पंजाबराव साळवे हिने देखील तिला त्रास दिला. घर बांधण्यासाठी २ लाख रुपये आण असा तगादा नणंद लावत होती. दिनांक १२ जून २०२३ रोजी सासू विमलाबाईने स्वातीला केस धरून खाली पाडले. सासऱ्याने शिवीगाळ केली, जाऊने केस धरून गालात चापटा हाणल्या, नवऱ्याने देखील दारू पिऊन शिवीगाळ केली असे स्वातीने तक्रारीत म्हटले आहे.या घटनेनंतर स्वाती माहेरी राहत होती.तिच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात पती सचिन जाधव सह, सासू, सासरे, नणंद ,जाऊ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.