आई वडिलांची साथ सुटली, दूरच्या नातेवाईकाने नात्याला कलंकित केले ; शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा! शेगाव तालुक्यातील घटना..

 
हिंद
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दूरच्या नातेवाईकाने सोबत राहत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य करत नात्याला कलंकीत केले. आई - वडिलांची साथ सुटल्यानंतर नातेवाईकाकडे राहणारी अल्पवयीन मुलगी वासनेची शिकार ठरली. घरातीलच एका सदस्याने तिच्यावर पाच ते सहा महिन्यापूर्वी शारीरिक अत्याचार केला. त्यामुळे पिडीत अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली हा किळसवाणा प्रकार ६ जून रोजी शेगाव येथे उघडकीस आला. 
ॲड
         Advt. 👆
 प्राप्त माहितीनुसार , पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील दहा महिन्यांपूर्वी मृत पावले. याआधी तिची आई लहानपणीच तिला सोडून गेली. त्यामुळे पिडीता तिचे शेगाव तालुक्यातील एका गावात दूरचे नातेवाईकाकडे राहायची. दरम्यान, १ जूनच्या पाच ते सहा महिन्याआधी तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला. आरोपी सोबत तिचे लग्न होणार होते. परंतु त्याआधी गैरफायदा घेवून आरोपीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे पिडीत मुलीला १९ आठवड्याची गर्भधारणा राहली आहे. अश्या तक्रारीवरून गणेश अमरसिंग डाबेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.