आमदाराच्या मुलाला, कुटुंबीयांना टोल मध्ये सुट नसतेच! आ. संजय रायमुलकरांचा राग बिनकामाचा; वाचा कुणाकुणाला असते टोल सुट..

बहुतांश ठिकाणी आमदार, आणि त्यांचे कुटुंबिय टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे परिचित असतात. त्यामुळे आमदाराच्या पोराला कोण मागेल टोल? या भीतीपोटी त्यांच्या गाड्या सोडल्या जातात. एखादवेळेस टोल मागितला तर आमदाराची पोर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात अशीही उदाहरणे आहेत. काही टोलनाक्यावर तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष, गल्लीछाप नेते यांच्याकडून देखील टोल वसूल करण्याची हिम्मत टोलनाक्यावरील कर्मचारी भीतीमुळे दाखवत नाहीत. समृध्दी महामार्गाच्या मेहकरच्या टोलनाक्यावर देखील संजय रायमुलकरांच्या मुलाची गाडी टोल न घेता सोडण्यात आली. टोल नाका मॅनेजरला याबाबत कळताच मॅनेजरने आमदाराच्या मुलाची गाडी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड केला, कामात हलगर्जीपणा केल्याने कंपनीने त्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले. अर्थात एवढं सगळं झाल्यावर ही बातमी आ. रायमुलकरांना कळली. अन् ताणाताणात आ. रायमुलकरांनी भरमसाठ शिव्या आणि धमक्या मॅनेजरला देऊन टाकल्या.
टोल कुणाला माफ?
दरम्यान भारतात काही गणमान्य व्यक्तींना टोल मध्ये सुट देण्यात आले आहे. आमदारांचा त्यात समावेश असला तरी आमदारांचा मुलगा, आमदाराचा नातू, आमदाराची बायको, आमदाराचा कार्यकर्ता, आमदाराचा साडू, नातेवाईक, पक्षाचा जिल्हाध्यक्ष, नेता अशा कुणाला त्यातून सुट नाही. आमदारांना देखील ही सुट केवळ त्यांच्या राज्यापुरती आहे. इतर राज्यात त्यांना टोल द्यावाच लागतो. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल, चीफ ऑफ स्टाफ पूर्ण जनरल किंवा समकक्ष अधिकारी,राज्याचे विधान परिषद अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, खासदार, थल सेना कमांडर किंवा उपसेना प्रमुख किंवा समकक्ष अधिकारी, संबधित राज्यांचे मुख्य सचिव, भारताचे सचिव, राज्याच्या परिषदेचे सचिव, राज्याच्या सभेचे सचिव,राज्याच्या यात्रेचे विदेशी गणमान्य व्यक्ती, संबधित राज्याचे विधान परिषद आणि विधान सभा सदस्य, परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र विजेते यांना टोल मधून सुट देण्यात आली आहे.