आमदार संजय गायकवाड म्हणतात तलवारीने केक कापने गुन्हा होऊ शकत नाही, मला कायद्याचे ज्ञान! मग हे काय? जिल्ह्यात याआधी दाखल झालेत गुन्हे! हा घ्या पुरावा...

 
Purana

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा झाला. शहरातील जयस्तंभ चौकात आ.गायकवाड व कुणाल गायकवाड यांनी तलवारीने केक कापला. मंचावर उपस्थित मंडळींना केक भरवला देखील. आता आ.गायकवाड यांचे हे कृत्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.विशेष म्हणजे यावर वादंग उठल्यानंतर आ.गायकवाड यांनी तलवारीने केक कापने गुन्हा नसल्याचे विधान केले. तलवारीचा वापर एखाद्याला मारण्यासाठी केला तर तो गुन्हा होऊ शकतो, एखाद्याला इजा पोहचण्याचा उद्देश असेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो.मला कायद्याचे ज्ञान आणि भान आहे असेही आ.गायकवाड यांनी स्वतःच्या कृत्याचे समर्थन करतांना म्हटले. मात्र जिल्हा पोलिसांनी याआधी अशा प्रकरणात अनेक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे बुलडाणा शहर पोलिस आता आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करतील का? असा सवाल ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

क्राईम
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका सभेत राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. त्यावेळी पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बुलडाणा जिल्ह्यात बिबी, धामणगाव बढे,खामगाव शहर पोलीस ठाण्यात देखील तलवारीने केक कापण्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. ४ जून २०२१ रोजी खामगाव शहर पोलिस अशाच पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे.बाळापूर फैल भागात तलवारीने केक कापून रोहन संजय बामनेट याने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यासह चौघा मित्रांवर गुन्हा दाखल केला होता.
अलीकडे धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत १४ डिसेंबर २०२३ रोजी मोहन सपकाळ याचा वाढदिवस होता. रात्री साडेनऊ वाजता मित्र जमले.
Adf
वाढदिवसाचा केक तलवारीने केक कापला, एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ देखील instagram वर टाकला. पोलिसांनी शोध घेऊन बर्थडे बॉय ला अटक केली. बर्थ डे बॉय मोहन सपकाळ, सागर काटे, राहूल काटे आणि अविनाश वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बिबी पोलीस ठाण्यात अलीकडच्या काळात तसा गुन्हा दाखल आहे.