चिमुकलीसोबत किळसवाणा प्रकार करणारा म्‍हातारा अटकेत!

नांदुरा तालुक्यातील घडली होती ही धक्कादायक घटना
 
child rape
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५० वर्षीय म्हाताऱ्याने घरात एकटी पाहून ९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना १५ नोव्हेंबरला नारखेड (ता. नांदुरा) येथे घडली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच मधुकर प्रल्हाद घोराडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी घोराडे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता २० नोव्हेंबरपर्यंत त्‍याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
 
१५ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीचे आई वडील दुपारी शेतात गेले होते. मुलगी दुपारी घरी एकटीच होती. ती अंघोळ करत असताना मधुकर न्हाणी घरात शिरला. त्याचे गुप्तांग मुलीला दाखवून कपडे काढायला सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील आजी-आजोबा धावत तिकडे गेल्याने मधुकरने घटनास्थळावरून पळ काढला होता. पीडित बालिकेचे आई-वडील शेतातून आल्यानंतर तिने हा प्रकार आई- वडिलांना सांगितला. रात्री उशिरा पीडितेच्या वडिलांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पीडित बालिका अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याने या प्रकरणात पोस्कोसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.