BREAKING समृद्धी महामार्गावरील मेहकरचा टोल नाका सकाळपासून फ्री..! नेमकी काय भानगड...वाचा..
Mar 12, 2024, 12:48 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर मधून मोठी बातमी समोर येत आहे. समृध्दी महामार्गावरील मेहकर (फर्दापूर) चा टोलनाका रात्रीपासून फ्री झाला आहे.. दोन महिन्यांपासून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे, त्यामुळे यंत्रणा हाताळण्यासाठी कुणीच नसल्याने टोल नाक्यावरून वाहने विना टोल जात आहेत..
प्राप्त माहितीनुसार समृध्दी महामार्गाच्या मेहकर (फर्दापूर) येथील टोलनाक्यावर ३ शिफ्ट मध्ये ४० ते ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. टोल वसूल करणाऱ्या कंपनीने दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकला आहे.