मेहकरात मुन्नाभाईचा कारनामा! रेडिओलॉजिस्टची डिग्री नसताना करायचा सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान;

गर्भवतीच्या पोटात काय आहे ते सांगायचा; छापा मारून दोघांना पकडले
 
Ggll
 मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरातील पवनसूतनगरमधील एका बंद खोलीत गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरच्या मालकासह दोघांना पीसीपीएनडीटी पथकाने छापा मारून पकडले. ३ ऑगस्टला दुपारी ही कारवाई करण्यात आली. किसन गरड असे सोनोग्राफी सेंटरच्या मालकाचे नाव असून, तो रेडिओलॉजिस्ट डॉक्टर नाही. तरीदेखील तो आपल्या सेंटरमधील मशीन अन्यन्त्र हलवून बंद खोलीत न्यायचा. पैशांसाठी गर्भलिंग निदान करण्याचा गोरखधंदा सुरू करून तो एकप्रकारे स्त्रीभ्रूणहत्या करण्यास दाम्पत्यांना प्रोत्साहन देत होता, अशी चर्चा आहे.
मेहकर
Advt.👆
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नेमलेल्या पथकाने पोलीस संरक्षणात ही कारवाई केली. यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या शिताफीने छापा मारून गर्भलिंग निदान करत असताना किसन हरिभाऊ गरड (रा. करंजी, ता. रिसोड जि. वाशीम) व गणेश शिवाजी सुलताने (गुंजखेड, ता. लोणार, जि. बुलढाणा) या दोघांना पथकाने रंगेहात पकडले.
किसर गरड हा वाशीम जिल्ह्याचा रहिवासी असून, त्याने मेहकरात सोनोग्राफी सेंटरची रितसर परवानगी घेतली आहे. या माध्यमातून त्याने चांगलाच आर्थिक जम बसविला. मात्र, पैशांची मोठी हाव सुटल्याने त्याने सोनोग्राफी सेंटरच्या मिळालेल्या मान्यतेचा फायदा घेत सोनोग्राफी मशीन दुसऱ्या ठिकाणी हलवून बेकायदा गर्भलिंग निदान करणे सुरू केले. विशेष म्हणजे परवाना त्याच्या नावावर असलातरी सोनाग्राफी करण्यासाठी त्याने तज्ज्ञ डॉक्टर ठेवायला हवा, असा नियम आहे.
या सेंटरमध्ये तो गर्भलिंग निदान करवून देऊ शकत नसल्याने त्याने पवनसूतनगरमधील एक खोली भाड्याने घेऊन त्याने हा काळाधंदा सुरू केला होता. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांना रिसोडची व्यक्ती मेहकरात बंद खोलीत गर्भलिंग निदान करवून देत असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, त्यांचे दोन कर्मचारी आणि दोन पोलीस कर्मचारी असे पथक नेमण्यात आले. या कारवाईकरिता पोलीस अधीक्षक सुनील कडासने, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व मेहकर पोलिसांनी सहकार्य केले. गर्भलिंग तपासणी करण्यासाठी एका दाम्पत्याला किसन गरडने बोलावून घेतले.
दुपारी एक वाजता त्याने तपासणी केली. दरम्यान, आधीच सापळा रचून बसलेल्या पथकाने धाड घातली आणि किसन गरड व गणेश सुलताने या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त
सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, दोघांनाही मेहकर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणी त्यांची कसून चौकशी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, या प्रकरणात गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
तिसरा संशयीत पोलिसांच्या ताब्यात
हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी गांभियनि घेतले असून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी या प्रकरणात काळजीपूर्वक लक्ष घालून आहेत. तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू असतानाच या प्रकरणाशी निगडित तिसऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनोद वामन ठोकळ असे त्याचे नाव असून तो मेहकर तालुक्यातील कणका येथील रहिवाशी आहे.